भारत आणि इस्रायलनं दहशतवादाविरोधात शून्य-सहिष्णुता दृष्टिकोन बाळगण्याचा पुनरुच्चार केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली आणि भारत-इस्रायल यांच्यातील सामरिक भागीदारी आणखी सक्षम करण्याविषयी विचारविनिमय केला. या संभाषणादरम्यान, दोन्ही नेत्यांनी सामायिक लोकशाही मूल्यं, परस्पर विश्वास आणि दूरदृष्टीच्या आधारावर भारत-इस्रायल सामरिक भागीदारी आणखी भक्कम करण्यासाठी सामायिक प्राधान्यक्रम निश्चित केले. दोन्ही नेत्यांनी एकमेकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आणि दोन्ही देशांतील लोकांना शांतता आणि समृद्धीसाठी सदिच्छा दिल्या.
Site Admin | January 8, 2026 9:29 AM | India | Israel
दहशतवादाविरोधात शून्य-सहिष्णुता दृष्टिकोन बाळगण्याचा भारत आणि इस्रायलचा पुनरुच्चार