January 23, 2026 5:59 PM

printer

भारतात संधींचं अभूतपूर्व लोकशाहीकरण होत आहे- केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह

भारतात संधींचं अभूतपूर्व लोकशाहीकरण होत आहे, असं प्रतिपादन केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी आज केलं. यामुळे युवांना त्यांच्यातल्या उपजत क्षमता शोधायला, त्यांचे स्वतःचे रस्ते निवडायला आणि त्यांच्यातल्या कौशल्यांचा वापर करून शाश्वत रोजगार निर्माण करायला मदत होत आहे, असंही त्यांनी सांगितलं. नवी दिल्ली इथं राष्ट्रीय कौशल्य परिषद २०२६ला ते संबोधित करत होते. आजची युवा पिढी ही अतिशय प्रतिभावान असून त्यांचं म्हणणं ऐकून घेणारे योग्य मार्गदर्शक आणि संस्था त्यांना मिळायला हव्यात, असं मत त्यांनी मांडलं. पदवी-केंद्रित ते कौशल्य-केंद्रित विकासाच्या दिशेने होणारी वाटचालही त्यांनी अधोरेखित केली. गेल्या ११ वर्षांत संधींचं लोकशाहीकरण झाल्यामुळे नागरिकांच्या आकांक्षाही वाढल्या असल्याचं ते म्हणाले.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.