भारत जगातला सर्वात मोठा दूध उत्पादक असल्याचं मंत्री राजीव रंजन सिंह यांचं प्रतिपादन

भारत जगभरातला सर्वात मोठा दूध उत्पादक असल्याचं प्रतिपादन मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय केंद्रीय मंत्री राजीव रंजन सिंह यांनी काल दिल्लीतल्या कार्यक्रमात केलं. दिल्लीसह देशभरात काल राष्ट्रीय दुग्ध दिवस साजरा करण्यात आला. २०३० सालापर्यंत देशातलं पशुधन रोगमुक्त होण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं सांगून रंजन म्हणाले की, पशुपालन व्यवसायाने देशाच्या आर्थिक विकासात मोठा हातभार लावला आहे. श्वेत क्रांतीचे पितामह म्हणवल्या जाणाऱ्या डॉ. वर्गीस कुरियन यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी २६ नोव्हेंबरला राष्ट्रीय दूध दिवस साजरा करण्यात येतो.