January 23, 2026 6:05 PM

printer

लोकशाही आणि निवडणूक व्यवस्थापनाविषयी इंडिया इंडरनॅशन कॉन्फरन्सचा समारोप

लोकशाही आणि निवडणूक व्यवस्थापनाविषयी नवी दिल्लीत आयोजित इंडिया इंडरनॅशन कॉन्फरन्सचा आज समारोप झाला. ३ दिवस चाललेल्या या परिषदेत विविध देशांचे १०० पेक्षा जास्त प्रतिनिधी सहभागी झाले होते. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी समारोपाच्या सत्रात परिषदेचा दिल्ली जाहीरनामा वाचून दाखवला आणि सर्व सहभागी संस्थांच्या प्रतिनिधींनी तो एकमताने स्वीकारला. मतदार याद्यांची शुद्धता, निवडणूक प्रक्रीया करणे, संशोधन आणि प्रकाशन, क्षमतावाढीसाठी तंत्रज्ञानाचा वापर या प्रमुख तत्वांवर काम करण्यासाठी सर्वांनी सहमती दर्शवली. निवडणूक प्रक्रीया सोपी आणि पारदर्शक व्हावी याकरता  निवडणूक व्यवस्थापन संस्थांनी मतदारांना छायाचित्रासह ओळखपत्रं द्यावी असं आवाहन ज्ञानेश कुमार यांनी केलं. मतदान प्रक्रीया सुलभ करणाऱ्या ECINET या मंचाचं उद्घाटन या परिषदेत झालं.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.