कनिष्ठ आशिया करंडक हॉकी स्पर्धेत भारत उपांत्यफेरीत

पुरुषांच्या कनिष्ठ आशिया चषक स्पर्धेच्या उपान्त्य फेरीत आज भारतीय संघाची मलेशिया बरोबर लढत होणार आहे. ओमानमध्ये मस्कत इथं भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री साडेआठ वाजता हा सामना सुरू होईल. या आधी रविवारी झालेल्या सामन्यानं भारतानं दक्षिण कोरियाचा 8 विरुद्ध 1 गोलाने पराभूत करून अ गटात अव्वल स्थान मिळवलं होतं. उपान्त्य फेरीतला आणखी एक सामना पाकिस्तान आणि जपानच्या संघांदरम्यान होणार आहे. स्पर्धेचा अंतिम सामना उद्या होईल.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.