इराण आणि इस्रायलमधे झालेल्या शस्त्रसंधीचं भारताकडून स्वागत

इराण आणि इस्रायलमधे झालेल्या शस्त्रसंधीचं भारताने स्वागत केलं आहे. पश्चिम आशियात सुरू असलेल्या संघर्षाला चर्चेशिवाय पर्याय नाही असं भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. पश्चिम आशियातल्या  देशांनी शांतता आणि स्थैर्यासाठी प्रयत्न करावेत, यात भारत आपली भूमिका निभावण्यासाठी तयार आहे, असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे.