दहशतवादाला प्रत्युत्तर देण्याचा, बचाव करण्याचा आणि सीमेपलीकडून होणाऱ्या कोणत्याही हल्ल्यांना प्रतिबंध करण्याचा भारताला अधिकार आहे; असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांच्याशी दूरध्वनीवरून झालेल्या संभाषणात, ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताने मोजून मापून कारवाई केल्याचं सांगून त्यात कोणताही अतिरेक नव्हता तसंच ती प्रमाणबद्ध आणि दहशतवादी पायाभूत सुविधा निष्क्रिय करण्यावर केंद्रित होती असं सांगितलं. सिंग आणि हेगसेथ यांनी भारत-अमेरिका संरक्षण भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी आणि क्षमता बांधणीत सहकार्य मजबूत करण्यासाठी सुरू असलेल्या तसंच नव्या उपक्रमांचा आढावा घेण्यासाठी चर्चा केली.
Site Admin | July 2, 2025 9:21 AM | Rajnath Singh
दहशतवादाला प्रत्युत्तर, बचाव आणि सीमेपलीकडच्या हल्ल्यांना प्रतिबंध करण्याचा भारताला अधिकार : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह
