आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत काल अबुधाबी इथं झालेल्या अ गटातील अंतिम साखळी सामन्यात भारतीय संघानं ओमानचा 21 धावांनी पराभव केला. भारतानं ओमानपुढं विजयासाठी 20 षटकांत 189 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. पण ओमानचा संघ 4 गड्यांच्या बदल्यात केवळ 167 धावा करू शकला.
अर्शदीप सिंग 64 सामन्यांमध्ये 100 आंतरराष्ट्रीय टी-20 बळी घेणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला. या स्पर्धेत भारतानं यापूर्वी जिंकलेल्या दोन सामन्यांसाठी चार गुण मिळवून सुपर 4 मध्ये पोहोचला आहे. ओमानचा संघ स्पर्धेतून बाहेर गेला आहे.