बिहार इथे सुरू असलेल्या आशिया कप हॉकी स्पर्धेच्या सुपर फोर फेरीत भारतीय संघाने चीनचा ७ – ० ने धुव्वा उडवत अंतिम फेरी गाठली आहे. आता अंतिम सामन्यात भारताचा सामना कोरियाशी होणार आहे. सुपर फोर फेरीत मिळवलेल्या विजयामुळे सात गुणांसह भारत गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. या स्पर्धेतल्या विजेत्या संघाला पुढच्या वर्षी होणाऱ्या हॉकी विश्वचषकासाठी पात्रता मिळवण्याची संधी मिळेल.
Site Admin | September 7, 2025 1:31 PM | Asia Cup Hockey tournament
भारताचा आशिया करंडक हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश
