लंडन इथं सुरू असलेल्या अँडरसन-तेंडुलकर क्रिकेट मालिकेतल्या पाचव्या आणि शेवटच्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी आज इंग्लंडचा संघ दुसऱ्या डावात १ बाद ५० धावांवरून खेळण्यास सुरुवात करेल.
भारतानं आपल्या दुसऱ्या डावात ३९६ धावा केल्या आणि इंग्लंडसमोर विजयासाठी ३७४ धावांचे लक्ष्य ठेवलं आहे. या मालिकेत इंग्लंडकडे २-१ अशी आघाडी आहे.