डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

‘भारताला जगातल्या तीन प्रमुख अर्थव्यवस्थांपैकी एक बनवण्यासाठी शहरांचा आर्थिक विकास महत्त्वाचा’

भारताला जगातल्या तीन प्रमुख अर्थव्यवस्थांपैकी एक बनवण्यासाठी प्रथम श्रेणी आणि द्वितीय श्रेणीतल्या शहरांचा आर्थिक विकास अत्यंत महत्त्वाचा असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. ते आज गुजरातमधे गांधीनगर इथे आयोजित कार्यक्रमात बोलत होते. जगातल्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेच्या क्रमवारीत ११व्या क्रमांकावरून चौथ्या क्रमांकावर झेप घेतली आहे, असंही मोदी यावेळी म्हणाले.

 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी गुजरातच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज गांधीनगरमध्ये ‘ऑपरेशन सिंदूर सन्मान यात्रेला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी त्यांच्यासोबत गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील उपस्थित होते. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या स्थानिकांनी ऑपरेशन सिंदूरसाठीचे फलक आणि तिरंगा हातात घेऊन घोषणा दिल्या. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.