युरेशियन इकॉनॉमिक युनियनसोबतच्या मुक्त व्यापार कराराबाबतच्या चर्चेला सुरुवात

रशियाच्या नेतृत्वातील युरेशियन इकॉनॉमिक युनियनसोबतच्या मुक्त व्यापार कराराबाबतच्या चर्चेला आज औपचारिक सुरुवात होणार आहे. केंद्रिय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी काल ही माहिती दिली. रशियासह अर्मेनिया, बेलारुस, कझाकस्तान आणि किर्गिझस्तान या देशांचा यामध्ये समावेश आहे. गेल्या 20 ऑगस्ट रोजी निश्चित केलेल्या शर्तींच्या अनुषंगानं ही चर्चा केली जाणार आहे. भारतीय उद्योग, शेतकरी आणि मत्स्य व्यावसायिक यांना नवी बाजारपेठ मिळवून देण्याचा या कराराचा उद्देश आहे. भारत इतर काही देशांसोबतच्या व्यापार कराराची शक्यता पडताळून पहात असल्याचं गोयल यांनी सांगितलं.