ऊर्जा क्षेत्रातलं सहकार्य वाढवण्यासाठी भारत आणि डेन्मार्क यांच्यात सामंजस्य करार

ऊर्जा  क्षेत्रातलं सहकार्य वाढवण्यासाठी भारत आणि डेन्मार्क यांनी आज नव्यानं सामंजस्य करार केला. २०७० पर्यंत शून्य कार्बन उत्सर्जनाचं उद्धिष्ट गाठण्याच्या भारताच्या महत्वाकांक्षी लक्ष्याला या करारामुळे पाठबळ मिळणार आहे. दोन्ही देशांमधे तंत्रज्ञान सहयोग, विशेषतः स्वच्छ आणि शाश्वत ऊर्जा उपायांची देवाणघेवाण वाढवणं हा या कराराचा उद्देश आहे. सीमापार विद्युतव्यापार, विद्युतवाहनांच्या चार्जिंगसाठी पायाभूत सुविधांचा विकास आणि वेगवेगळ्या पुर्ननवीकरणीय ऊर्जांचं एकात्मिकरण यासारख्या क्षेत्रांमधे उभय देशांमधली भागीदारी या करारामुळे वाढणार आहे.