भारतातून आयात होणाऱ्या वस्तूंवर अतिरिक्त शुल्क लादण्याच्या अमेरिकेच्या निर्णयानंतर भारतानं ४० इतर देशांमध्ये भारतीय वस्तूंविषयी जनजागृती करायचा निर्णय घेतला आहे. ब्रिटन, स्पेन, फ्रान्स, जर्मनी, इटली, रशिया, कॅनडा, तुर्किये, ऑस्ट्रेलिया यासारख्या देशांचा यात समावेश आहे. या देशांमध्ये व्यापार मेळावे, खरेदीदार-विक्रेते यांच्या बैठका, विभिन्न उद्योगांवर लक्ष केंद्रित करणाऱ्या मोहिमा राबवल्या जाणार आहेत.
यासंदर्भात केंद्रीय वाणिज्य मंत्रालय या आठवड्यात निर्यातदारांची बैठक घेणार आहे. यात अधिकाधिक बाजारपेठांमध्ये निर्यात वाढवण्यावर आणि अधिकाधिक वस्तू निर्यातीसाठी उपलब्ध करण्यावर भर दिला जाणार आहे.