प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना सायप्रसचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना सायप्रसचा  ‘ग्रँड कोलार ऑफ दी ऑर्डर ऑफ दी मकारिओस थर्ड’ हा सर्वोच्च नागरी सन्मान आज सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्तोदौलिदेस यांनी प्रदान केला. सायप्रसचे पहिले राष्ट्राध्यक्ष आर्चबिशप मकारिओस थर्ड यांच्या नावाचा हा पुरस्कार विविध देशाच्या प्रमुख आणि नामवंत व्यक्तींना त्यांच्या अतुलनीय कार्यासाठी दिला जातो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सायप्रसचा सर्वोच्च नागरी सन्मान मिळाल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. 

 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी काल पासून पाच दिवसांच्या सायप्रस, कॅनडा आणि क्रोएशिया या देशांच्या दौऱ्यावर आहेत. सायप्रस मध्ये गेल्या 23 वर्षातील भारताच्या प्रधानमंत्र्यांची ही पहिली भेट आहे. मोदी यांनी काल लिमासोलमध्ये व्यापार विषयक परिषदेत सहभाग घेतला आणि उपस्थितांना संबोधित केलं.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.