डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

November 4, 2024 8:29 PM | Canada | India

printer

कॅनडामध्ये हिंदू सभा मंदिरात अतिरेक्यांनी केलेल्या हिंसाचाराचा भारताकडून निषेध

कॅनडामध्ये काल ओंटारियो इथं ब्रॅम्प्टनमधल्या हिंदू सभा मंदिरात अतिरेकी आणि फुटीरतावाद्यांनी केलेल्या हिंसाचाराचा भारताने निषेध केला आहे. कॅनडामधल्या  भारतीय नागरिकांच्या सुरक्षेबाबत भारताने  तीव्र चिंता व्यक्त केली आहे. सर्व प्रार्थनास्थळे अशा हल्ल्यांपासून सुरक्षित राहतील, हिंसाचार करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, अशी भारताची अपेक्षा आहे, असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी कॅनडा सरकारला दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे. दरम्यान व्हँकुव्हर आणि सरे इथंही २ आणि ३ नोव्हेंबरला अशाच प्रकारच्या सभांमध्ये  असाच हिंसाचार झाला होता.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.