July 15, 2025 1:26 PM

printer

जीवाश्मेतर इंधनातून ५० टक्के वीजनिर्मितीचं उद्दिष्ट निर्धारित मुदतीच्या 5 वर्ष आधी पूर्ण

भारतानं ऊर्जानिर्मितीच्या क्षेत्रात नवीन टप्पा पूर्ण केला आहे. जीवाश्मेतर इंधनातून वीजनिर्मितीचं ५० टक्के उद्दिष्ट निर्धारित मुदतीच्या पाच वर्ष आधीच पूर्ण झालं आहे. भारताची एकूण वीजनिर्मिती क्षमता ४८४ गिगावॅट असून, त्यापैकी २४२ गिगावॅट वीजनिर्मिती सध्या जीवाश्मेतर इंधनाच्या माध्यमातून होत आहे.

 

त्यामुळे स्वच्छ आणि पर्यावरणपूरक ऊर्जेबाबत भारतानं केलेला निश्चय प्रत्यक्षात येत असल्याचं स्पष्ट झालं आहे. नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ही घटना ऐतिहासिक असल्याचं समाजमाध्यमावर म्हटलं आहे. २०३० या वर्षापर्यंत जीवाश्मेतर इंधनाच्या वापरातून ५० टक्के वीजनिर्मितीचं  उद्दिष्ट ठेवण्यात आलं होतं. मात्र २०२५ मध्येच ते साध्य झालं असून, प्रत्येक भारतीयासाठी हे अभिमानास्पद आहे, असंही त्यांनी नमूद केलं.