दहशतवादाविरोधात भारताच्या भूमिकेला कोलंबियाचा पाठिंबा

काँग्रेस खासदार शशि थरूर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज कोलंबियाच्या परराष्ट्र व्यवहार उपमंत्री रोझा योलांडा व्हिलाविचेंसिओ यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान पाकिस्तानबद्दल शोक व्यक्त करणाऱ्या कोलंबियाच्या विधानावर थरूर यांनी नाराजी व्यक्त केली. मात्र भारताच्या भूमिकेला कोलंबियानं पाठिंबा दिला असून हे विधान मागे घेतल्याचं त्यांनी समाजमाध्यमावर केलेल्या पोस्ट मध्ये म्हटलं आहे.