राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल सध्या चीनच्या दौऱ्यावर असून काल त्यांनी बीजिंगमध्ये चिनचे परराष्ट्र व्यवहारमंत्री वांग यी यांची भेट घेतली. आशियायी प्रदेशामध्ये शांतता आणि स्थैर्य राखण्यासाठी आणि सर्व प्रकारच्या दहशतवादाचा एकत्रितपणे सामना करण्याची आवश्यकता असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं. या बैठकीदरम्यान दोन्ही नेत्यांनी भारत-चीन द्विपक्षीय संबंधांमधील अलीकडच्या घटनांचा आढावा घेतला आणि भारत-चीन द्विपक्षीय संबंध आणखी विकसित करण्यासाठी उभय देशातील जनतेचे परस्पर संबंध मजबूत करण्यावर भर दिला.
24 व्या विशेष प्रतिनिधी चर्चासत्रासाठी वांग यी यांची भारतात भेट घेण्यासाठी उत्सुक असल्याचं डोवाल यांनी सांगितलं. अजित डोवाल शांघाय सहकार्य संघटनेच्या सुरक्षा परिषद सचिवांच्या 20 व्या बैठकीसाठी चीनच्या दौऱ्यावर आहेत.