डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

May 9, 2025 3:04 PM | India-Chile

printer

भारत – चिली देशांच्या व्यापक आर्थिक भागीदारी करारासाठी संदर्भ शर्तींवर स्वाक्षऱ्या

भारत आणि चिली या दोन्ही देशांनी काल व्यापक आर्थिक भागीदारी करारासाठी संदर्भ शर्तींवर स्वाक्षऱ्या केल्या. भारतातले चिलीचे राजदूत जुआन अँगुलो आणि भारताच्या वाणिज्य विभागाचे सहसचिव विमल आनंद यांनी काल झालेल्या चर्चेनंतर स्वाक्षऱ्या केल्या. दोन्ही देशांनी द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यासाठी सामायिक प्रयत्नांचा पुनरुच्चार केल्याचं वाणिज्य मंत्रालयाने आपल्या निवेदनात म्हटलं आहे. या करारात आर्थिक एकात्मता आणि सहकार्य वाढीसाठी डिजिटल सेवा, गुंतवणूक प्रोत्साहन आणि सहकार्य, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग यांसारख्या विविध क्षेत्रांचा समावेश आहे.