डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

भूतानचा दौरा आटोपून प्रधानमंत्री मोदी मायदेशी रवाना

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि भूतान नरेश  जिग्मे खेसार नामग्येल वांगचुक यांनी आज थिंपू इथं कालचक्र उत्सवाचं संयुक्तपणे उद्घाटन केलं.  हा जागतिक शांततेसाठी प्रार्थना करण्याचा बौद्ध पारंपरिक उत्सव बौद्ध धर्मगुरु, ‘जे खेनपो’ यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे. प्रधानमंत्र्यांनी समाजमाध्यमावर ही माहिती दिली. त्यानंतर ते मायदेशी परत यायला निघाले. या दौऱ्यात त्यांनी भूतानचे राजा जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्यासाठी तसंच  परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा केली. दिल्लीतल्या  स्फोटात झालेल्या जीवितहानीबद्दल  राजे वांगचुक यांनी शोकसंवेदना व्यक्त केली. 

 

भूतानच्या ऊर्जा प्रकल्पांसाठी सवलतीच्या दराने ४० अब्ज रुपये पतपुरवठा करण्याची घोषणा मोदी यांनी काल केली. नवीकरणीय ऊर्जा, आरोग्य अशा महत्त्वाच्या क्षेत्रात ३ सामंजस्य करारांवर प्रधानमंत्र्यांच्या या दौऱ्यात स्वाक्षऱ्या झाल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज भूतानचे प्रधानमंत्री दाशो त्शेरिंग तोबगे यांच्याशीही चर्चा केली.