डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

भारत – भूतान यांच्यातले संबंध भविष्यातही वृद्धिंगत होतील – प्रधानमंत्री मोदी

प्रधानमंत्री मोदी दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी आज सकाळी भूतानमध्ये दाखल झाले. भूतानचे प्रधानमंत्री त्शेरिंग तोबगे यांनी मोदी यांचं विमानतळावर स्वागत केलं. अनेक शतकांपासून भारत आणि भूतान मधले सांस्कृतिक, राजकीय संबंध अतिशय चांगले असून भविष्यातही ते वृद्धिंगत होतील, असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी थिंपू इथं आयोजित कार्यक्रमात व्यक्त केला. 

 

भूतानसाठी, भूतानच्या राजघराण्यासाठी आणि जागतिक शांततेवर विश्वास ठेवणाऱ्या सर्वांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा असल्याचं मोदी यांनी यावेळी सांगितलं. 

 

भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचूक यांच्या ७०व्या वाढदिवसानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमात प्रधानमंत्री मोदी प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी होणार आहेत. भारत आणि भूतान यांनी संयुक्तपणे विकसित केलेल्या एक हजार २० मेगावॅट क्षमतेच्या पुनात्सांग-छू दोन या जलविद्युत प्रकल्पाचं उद्घाटन प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते होणार आहे.