डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

December 17, 2024 2:57 PM | India | smartphones

printer

स्मार्टफोन्सच्या निर्यातीत भारत जगातला तिसरा निर्यातदार देश

स्मार्टफोन्सच्या निर्यातीत  २०१९  साली  जगात २३ व्या क्रमांकांवर असलेला भारत आता स्मार्टफोन्सचा जगातला तिसरा निर्यातदार देश बनला आहे. नोव्हेंबर मध्ये देशातल्या स्मार्टफोन निर्यातीनं एकाच महिन्यात २० हजार कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि  माहिती तंत्रज्ञान मंत्री  अश्विनी वैष्णव यांनी या यशाचं  मेकिंग भारत स्टोरी  या शब्दांत कौतुक केलं. उत्पादन आधारित परतावा   धोरणाच्या अंतर्गत चालू आर्थिक वर्षात ७० ते ७५ टक्के निर्यातीचं ठरवलेलं  उद्दिष्ट  यामुळे अगोदरच गाठलं गेलं आहे. 

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.