डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

September 12, 2024 1:51 PM | FIDE Chess Olympiad

printer

FIDE बुद्धीबळ स्पर्धेत मोरोक्को आणि जमैकावर मात करत भारताची दमदार सुुरुवात

४५ व्या FIDE बुद्धीबळ स्पर्धेच्या कालच्या पहिल्याच दिवशी भारताने खुल्या गटात मोरोक्कोवर आणि महिलांच्या गटात जमैकावर मात करत दमदार सुुरुवात केली. सुरुवातीच्या सामन्यात डी गुकेश हा पहिल्या फेरीतून बाहेर पडल्यानंतर आर प्रज्ञनंद यानं सर्वोत्तम खेळ करत मोरोक्कोच्या तिसीर मोहम्मद याला पराभूत केलं. त्यानंतर विदित गुजराथी याने औखीर मेहदी पिएर याला आणि पेंताला हरिकृष्णा याने मोयाद अनास याला हरवलं. तर अर्जुन एरिगसी याने एल्बिया जॅक्स याला नमवत भारताचा ४-० असा विजय निश्चित केला. 

 महिलांच्या गटात वैशाली हिने ऍडनी क्लार्कचा, तनिया सचदेवने गॅब्रिएला वॉट्सनचा आणि दिव्या देशमुखने रचेल मिलर हिचा पराभव  केला. तर वंतिका अग्रवालचा रेहन्ना ब्राऊनसोबतचा सामना बरोबरीत सुटला.