महिला क्रिकेट : तीन सामन्यांच्या मालिकेत भारताचा वेस्टइंडिजवर विजय

महिलांच्या वीस षटकांच्या क्रिकेट मालिकेत भारतानं वेस्टइंडिजचा तिसऱ्या सामन्यात 60 धावांनी पराभव करत ही मालिका 2-1 अशी जिंकली. नवी मुंबईत झालेल्या या सामन्यात भारतीय महिलांनी टी-ट्वेंटीमधील आजवरची सर्वाधिक 217 धावसंख्या उभारली. स्मृती मंधनानं 77 तर रिचा घोषनं 54 धावा केल्या. रिचानं केवळ 18 चेंडूत पन्नास धावा काढून विक्रम केला, ती सामनावीर ठरली. उत्तरादाखल वेस्टइंडीज संघ 20 षटकात 9 बाद 157 धावाच करु शकला. स्मृती मंधनाला मालिकावीर पुरस्कार देण्यात आला. उभय संघांमध्ये पन्नास षटकांची मालिका परवा 22 तारखेपासून सुरु होत आहे.