डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

महिला आशिया चषक टी- ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत भारताचा संयुक्त अरब अमिरातीवर ७८ धावांनी विजय

 

महिला आशिया चषक टी- ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत आज भारतानं संयुक्त अरब अमिरातीवर ७८ धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना भारतानं निर्धारित २० षटकात ५ गडी गमावून २०१ धावा केल्या. कर्णधार हरमनप्रीत कौरनं ६६, तर रिचा घोषनं २९ चेंडूत नाबाद ६४ धावा केल्या. फाली वर्मानं ३७ धावांचं योगदान दिलं.

 

भारताच्या धावसंख्येचा पाठलाग करतान संयुक्त अरब अमिरातीला निर्धारित २० षटकात ७ गडी गमावून १२३ धावाच करता आल्या. कवीशा एगोडेगनं सर्वाधिक नाबाद ४० धावा केल्या. कर्णधार ईशा रोहित ओझानं ३८ धावा केल्या.

 

भारतातर्फे दिप्ती शर्मानं २, तर रेणूका ठाकूर, तनुजा कंवर, ओझा वस्त्रकार, आणि राघव यादव यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला. या विजयामुळे गुणतालिकेत ४ गुणांसह भारत अग्रस्थानी असून, अ गटातला भारताचा शेवटचा सामना येत्या मंगळवारी नेपाळशी होणार आहे.