टी- ट्वेंटी महिला क्रिकेट आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तानला हरवत भारताची विजयी सलामी

महिलांच्या टी- ट्वेंटी क्रिकेट आशिया चषक स्पर्धेत काल आपल्या पहिल्या साखळी सामन्यात भारतानं पाकिस्तानचा ७ गडी राखून पराभव केला. श्रीलंकेतल्या दांबुला इथे काल झालेल्या या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत भारतीय महिला संघाला १०९ धावांचं आव्हान दिलं. भारतीय संघानं पंधराव्या षटकात तीन बळींच्या मोबदल्यात हे आव्हान सहज पार केलं. भारताचा पुढचा सामना उद्या संयुक्त अरब अमिरात संघाशी होणार आहे.