डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

November 27, 2024 9:39 AM | Bangladesh | India

printer

बांग्लादेशमधील हिंदू समुदाय आणि इतर अल्पसंख्याकांची शांतता आणि सुरक्षा सुनिश्चित करावी, भारताचं बांग्लादेशला आवाहन

बांग्लादेशमधील हिंदू समुदाय आणि इतर अल्पसंख्याकांची शांतता आणि सुरक्षा सुनिश्चित करावी असं आवाहन भारतानं बांग्लादेश सरकारला केलं आहे. अल्पसंख्याकांच्या मुलभूत हक्कांसाठी काम करणाऱ्या बांग्लादेश संमिलीत सनातन जागरण मंच चे प्रवक्ते प्रभु चिन्मय कृष्ण दास यांना नुकतीच अटक करण्यात आली होती. काल त्यांना जामीन नाकारण्यात आला. या घटनेबद्दल भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं निवेदन जारी करुन तीव्र नाराजी व्यक्त केली. दरम्यान, प्रभु दास यांच्या सुटकेची मागणी करत चटगाव न्यायालयाच्या आवारात जमलेल्या इस्कॉन पुंडरिक धामच्या अनुयायांवर काल लाठीचार्ज करण्यात आला. गेल्या काही दिवसांपासून बांग्लादेशातील अतिरेकी घटकांकडून विविध भागात राहणाऱ्या हिंदूची घरं, आस्थापना लुटली जात असून मंदिरांची तसंच देवतांच्या मुर्तींची विटंबना केली जात आहे.