जयपूरच्या पोलो ग्राउंडवर झालेल्या २०२५च्या कोग्नीवेरा आंतरराष्ट्रीय पोलो विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतानं जगात अव्वल स्थानी असलेल्या अर्जेंटिनाचा १०-९ असा पराभव केला. या ऐतिहासिक विजयानं पोलोची जन्मभूमी असलेल्या भारतात, या क्रीडाप्रकाराच्या विकासाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. सवाई पद्मनाभ सिंह आणि कर्णधार सिमरन सिंह शेरगिल यांच्या नेतृत्वाखालच्या भारतीय संघानं उत्तम कामगिरी केली. भारतात पोलोचा समृद्ध वारसा असूनही, या खेळाला मर्यादित क्लब, जास्त खर्च आणि कमी प्रायोजकत्व अशा आव्हानांचा सामना करावा लागतो. मात्र, या विजयामुळे युवा खेळाडू या क्रीडा प्रकाराकडे आकर्षित होतील, आणि शासकीय पातळीवर या खेळाच्या विकासासाठी प्रयत्न होतील, अशी आशा निर्माण झाली आहे.
Site Admin | November 9, 2025 7:50 PM | KogniVera International Polo Cup
कोग्नीवेरा आंतरराष्ट्रीय पोलो विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने केला अर्जेंटिनाचा पराभव