डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

October 8, 2024 10:53 AM | India | Maldives

printer

भारताकडून मालदीवला ४०० दशलक्ष डॉलर्सची मदत जाहीर

भारताने मालदीवला ४०० दशलक्ष डॉलर्सची मदत आणि पूर्वनिर्धारित अटी आणि शर्तींसह परस्परांचं 3 हजार कोटी रुपयांचं चलन अदलाबदल करण्याला काल मंजुरी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मालदीवचे राष्ट्रपती डॉ मोहम्मद मुइज्जू यांच्यात काल नवी दिल्लीत झालेल्या शिष्टमंडळ स्तरावरील चर्चेदरम्यान हा निर्णय घेण्यात आला. मालदीवसमोरील आर्थिक आव्हानांचा सामना करण्यासाठी ही मदत महत्त्वाची ठरणार आहे. भ्रष्टाचार रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांच्या पार्श्वभूमीवर दोन करारावर यावेळी स्वाक्षरी करण्यात आली तसंच यापुर्वीच्या करारांचं नुतनीकरण करण्यात आलं.