भारत आणि युरोपियन युनियनमधील मुक्त व्यापार करार लवकर पूर्ण करण्यासाठी इटलीचा पाठिंबा

भारत आणि युरोपियन युनियनमधला मुक्त व्यापार करार लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी इटलीचं संपूर्ण समर्थन आहे, असं प्रतिपादन इटलीचे उप प्रधानमंत्री अंटोनियो ताजनी यांनी केलं आहे. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्या सोबत ताजनी यांची बैठक झाली त्यानंतर त्यांनी हे स्पष्ट मत व्यक्त केलं. उभय देशात धोरणात्मक भागीदारी असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. परस्पर देशांच्या मंत्र्यांनी भूमध्यसागरीय, मध्य पूर्व, युक्रेन आणि इंडो-पॅसिफिक क्षेत्रातल्या घडामोडींवर या बैठकीत चर्चा केली, असं परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी सांगितलं.