डेव्हिस चषक टेनिसस्पर्धेत भारत विरुद्ध स्वित्झर्लंड सामने आजपासून स्वित्झर्लंडमधे बायल इथं सुरु होत आहेत. भारताचा अग्रणी खेळाडू सुमीत नागल कडून एकेरीमधे चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.
आर्यन शाह आणि दक्षिणेश्वर सुरेश हे दोघे ही एकेरीत खेळणार आहेत. दुहेरीत एन श्रीराम बालाजी आणि ऋत्विक चौधरी बोलिपल्ली भारताचं प्रतिनिधित्व करतील. कर्णधारपदाची जबाबदारी रोहित राजपाल कडे आहे. या सामन्यातला विजयी संघ २०२६च्या पात्रता फेरीसाठी निवडला जाईल. भारताने यापूर्वी डेविस चषकाचं उपविजेतेपद मिळवलं आहे.