भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या टी-२० क्रिकेट मालिकेतला पाचवा आणि शेवटचा सामना आज अहमदाबादमध्ये नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरु आहे. दक्षिण आफ्रिकेनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे.
शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या एका षटकात बिनबाद ६ धावा झाल्या होत्या.
या मालिकेत भारत २-१ नं आघाडीवर आहे. बुधवारी लखनौच्या एकाना स्टेडियमवर आयोदित चौथा टी-२० सामना धुक्यामुळे रद्द करावा लागला होता.