डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

बंगलोर क्रिकेट कसोटी सामन्यात भारताच्या दुसऱ्या डावात फलंदाजांना सूर गवसला

भारत आणि न्यूझीलंड दरम्यान बेंगळुरूच्या चिन्नास्वामी मैदानावर सुरु असलेल्या पहिल्या क्रिकेट कसोटीत अखेर भारतीय फलंदाजांना सूर गवसला.  काल तिसऱ्या दिवशी रोहित शर्मा, विराट कोहली आणि सर्फराझ खान यांनी अर्धशतकं झळकावली आणि दिवसअखेर ३ बाद २३१ धावांचा पल्ला गाठला. आज सकाळी खेळ सुरु झाल्यावर सर्फराज खाननं  आंतरराष्ट्रीय कसोटीतलं पहिलं शतक झळकावलं तर ऋषभ पंत यानं ५५ चेंडूत ५० धावा फटकावल्या. भारताची धावसंख्या ३ बाद ३४४ असताना पाऊस पडू लागला आणि उपाहारासाठी  खेळ थांबवण्यात आला.

शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या  ४ बाद ४१९  धावा झाल्या होत्या.