भारत आणि जपान यांच्यात १ लाख ८ हजार कोटी रुपयांचे कर्जाचे करार

जपानच्या, विकास सहायता कार्यक्रमांतर्गत सहा महत्वाच्या प्रकल्पांसाठी भारत आणि जपान यांच्यात १ लाख ८ हजार कोटी रुपयांचे कर्जाचे करार झाले आहेत. नवी दिल्लीत काल भारत आणि जिका अर्थात जपान इंटरनॅशनल को ऑपरेटिव्ह एजन्सी यांनी या करारांवर सह्या केल्याचं अर्थमंत्रालयानं प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. वन व्यवस्थापन, पाणी पुरवठा, नागरी वाहतूक, ॲक्वाकल्चर, जैवविविधता संवर्धन, गुंतवणूक प्रोत्साहन, अशा विविध क्षेत्रांमधल्या उपक्रमांना या करारामुळे बळ मिळणार आहे.