डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

May 5, 2025 1:12 PM | India-Japan

printer

भारत आणि जपानच्या संरक्षण मंत्र्यांची आज दिल्लीत द्वीपक्षीय बैठक

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची आज जपानचे संरक्षण मंत्री जनरल नाकातानी यांच्याबरोबर नवी दिल्ली इथे द्विपक्षीय बैठक होत आहे. या बैठकीत दोन्ही देशांच्या प्रादेशिक तसंच आंतरराष्ट्रीय सुरक्षा परिस्थितीवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

 

त्या दृष्टीने संरक्षण सहकार्यात वाढ करण्याच्या मार्गांवरही चर्चा होणार आहे. या बैठकीपूर्वी जनरल नाकातानी यांनी नवी दिल्लीतल्या शहीद स्मारकावर आदरांजली वाहिली. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात संरक्षण मंत्र्यांच्या आसियान विषयक संवादानंतरची दोन्ही देशांच्या संरक्षण मंत्र्यांमधली ही दुसरी बैठक आहे. .