January 12, 2026 7:03 PM

printer

भारत आणि जर्मनी या दोन देशांमध्ये १९ महत्त्वाचे सामंजस्य करार

जर्मनीचे चान्सलर फ्रेडेरिक मर्झ यांच्या भारत दौऱ्यादरम्यान आज भारत आणि जर्मनी या दोन देशांमध्ये १९ महत्त्वाचे सामंजस्य करार आणि ८ महत्त्वाच्या घोषणा झाल्या. भारताचा पासपोर्ट असलेल्यांना जर्मनीत व्हिजामुक्त प्रवास, तसंच भारतीय आरोग्य कर्मचाऱ्यांना नोकऱ्या देण्यासाठी नवा आराखडा यांचा यात समावेश आहे. द्विपक्षीय औद्योगिक सहकार्य वाढवणं, तसंच व्यापार आणि गुंतवणुकीला चालना देण्यासाठी एका मुख्य कार्यकारी अधिकारी मंचाच्या स्थापनेबाबत संयुक्त इरादापत्रावरही आज स्वाक्षरी झाली. चान्सलर मर्ज यांच्या भेटीदरम्यान संरक्षण, व्यापार, कौशल्य, शाश्वत ऊर्जा आणि नागरिकांमधले संबंध इत्यादी क्षेत्रांमध्ये परस्पर सहकार्य वाढवण्याच्या दिशेनं महत्त्वाची पावलं उचलल्याचं प्रतिपादन परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी वार्ताहर परिषदेत केलं. नवीकरणीय ऊर्जा, हरित हायड्रोजन आणि हरित आणि शाश्वत विकास भागीदारीअंतर्गत जर्मनीनं १२४ कोटी युरोचं अर्थसहाय्य द्यायची घोषणा केली.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.