“ग्लोबल साऊथ स्वतःचं भविष्य घडवत आहे, भारत आणि इथियोपिया या दोन्ही देशांकडे त्या संदर्भातल्या संकल्पना आहेत”, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. प्रधानमंत्र्यांनी आज इथियोपियाच्या संसदेला संबोधित केलं. इथियोपियाला सिंहाची भूमी असं संबोधून भारतातील गुजरात हीसुद्धा सिंहाची भूमी म्हणून ओळखली जाते असं सांगत, भारत आणि इथियोपियामधील हवामानासह अनेक साम्य प्रधानमंत्र्यांनी यावेळी अधोरेखित केली. वी द पीपल हे शब्द भारतीय संविधानाच्या सुरवातीला आहेत तर इथिओपियाचं संविधान वी द नेशन नॅशनॅलिटीज अँड पीपल ऑफ इथिओपिया या शब्दांनी सुरु होतं तसंच वंदेमातरम हे भारताचं राष्ट्रीयगीत आणि इथियोपियाचं राष्ट्रगीत या दोन्हीमध्ये देशाला मातृभूमी म्हणून संबोधलं आहे, असं सांगून दोन्ही देशांमध्ये समान संस्कृती आहे असं त्यांनी सांगितलं.
दोन हजार वर्षांपूर्वी आपल्या पूर्वजांनी सागरी व्यापाराच्या माध्यमातून सोने आणि मसाले यांच्या देवाण घेवाण केली त्याचसोबत त्यांनी संकल्पना आणि राहणीमान यांचीही देवाण घेवाण केली असं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं. अदिस अबाबा आणि धोलेरा ही व्यापाराचीच नाही तर संस्कृतीची केंद्रे होती असं प्रतिपादन प्रधानमंत्र्यांनी केलं. महात्मा गांधीनी आपल्याला काळजीवाहू ही संकल्पना दिली. या ग्रहावरच्या संसाधनाचे आपण काळजीवाहू आहोत आणि ही संसाधने आपल्याला पुढच्या पिढीपर्यंत पोचवायची आहेत असं प्रतिपादन त्यानी केलं. त्या दृष्टीनेच ‘एक पेड माँ के नाम’ ही योजना आपण सुरु केल्याचं त्यांनी सागितलं. आफ्रिकन देशांना जी20 चे कायमस्वरुपी सदस्य करुन घेण्यासाठी तसंच इथियोपियाला ब्रिक्सचं सदस्य करुन घेण्यात भारतानं महत्वाची भूमिका बजावली हे यावेळी प्रधानंत्र्यांनी अधोरेखित केलं.
इथियोपियाचे प्रधानमंत्री अबीय अहमद अली यांच्यासोबत अदिस अबाबा इथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची विस्तृत चर्चा झाली. या भेटीत आठ करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या. अदवा व्हिक्टरी मेमोरियल संग्रहालयालाही त्यांनी भेट दिली. जागतिक पातळीवरील दूरदर्शी नेतृत्व आणि भारत-इथियोपिया भागीदारी बळकट करण्यामध्ये विलक्षण योगदान दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काल इथियोपियाचे पंतप्रधान डॉ. अबी अहमद अली यांच्या हस्ते, सर्वोच्च द ग्रेट ऑनर निशान ऑफ इथियोपिया सन्मानाने गौरवण्यात आले. हा पुरस्कार मिळवणारे मोदी पहिलेच जागतिक राष्ट्रप्रमुख आहेत. प्रधानमंत्री मोदी सध्या अफ्रिकन देशांच्या दौऱ्यावर आहेत. मोदींना मिळालेला हा २८वा परदेशी पुरस्कार आहे