भारत आणि चिली यांच्यात व्यापार आणि गुंतवणूक वाढवण्यासाठी करार

भारत आणि चिली यांनी व्यापार आणि गुंतवणूक वाढवण्यासाठी व्यापक आर्थिक भागीदारी करार केला असून त्याला सहमति दर्शवली आहे. चिलीचे प्रधानमंत्री गॅब्रिएल बोरीक फोन्ट सध्या भारत भेटीवर आहेत.

 

या भेटी दरम्यान काल हा निर्णय झाला असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालायचे सचिव पेरीयासामी कुमारंन यांनी नवी दिल्लीत प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं.

 

दोन्ही देशांमध्ये सध्या आंशिक व्यापार करार आहे त्यामध्ये वाढ करून व्यापक परराष्ट्र व्यापार करारामध्ये विस्तार करणं हा यामागचा उद्देश असल्याचं कुमारन यांनी सांगितलं.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.