डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

लोकसभा निवडणुकीचे एक्झिट पोल जाहीर झाल्यानंतर शेअर बाजारात आलेल्या तेजीप्रकरणी इंडिया आघाडीच्या खासदारांची सेबीकडे तक्रार

लोकसभा निवडणुकीचे एक्झिट पोल जाहीर झाल्यानंतर शेअर बाजारात आलेल्या तेजीप्रकरणी इंडिया आघाडीच्या खासदारांनी आज सेबीकडे तक्रार केली. हे एक्झिट पोल राजकीय हेतूने प्रेरित होते, त्यांनी शेअर बाजारात हस्तक्षेप केल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी, सागरिका घोष, साकेत गोखले आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी केला आहे. निकाल जाहीर झाले त्या दिवशी शेअर बाजारात मोठी घसरण झाली. त्यामुळं गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले. याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी सेबीच्या प्रतिनिधींची मुंबईत भेट घेऊन केली. भाजपा नेते अमित शहा यांनी वारंवार समभाग खरेदीचे सल्ले दिले, याचीही चौकशी करण्याची मागणी केल्याचं कल्याण बॅनर्जी यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. यापूर्वी या खासदारांनी शरद पवार यांची भेट घेतली.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.