दहशतवादाविरुद्ध लढाईला जर्मनीच्या पाठिंब्याबद्दल परराष्ट्र मंत्र्यांकडून कृतज्ञता व्यक्त

भारताच्या दहशतवादाविरुद्धच्या लढाईला आणि स्वतःचं संरक्षण  करण्याच्या अधिकाराला जर्मनीनं दिलेल्या पाठिंब्याबद्दल परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. बर्लिन इथल्या ‘जर्मन कौन्सिल ऑन फॉरेन रिलेशन्स’ या विषयावरील परिसंवादाला संबोधित करताना ते बोलत होते. जर्मनीनं अगदी सुरुवातीलाच भारतामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला असून जर्मनीचे परराष्ट्र मंत्री जोहान वाडेफुल यांनी भारताचा स्वतःचं संरक्षण करण्याचा अधिकार मान्य केला आहे, जर्मनीच्या या स्पष्ट भूमिकेमुळे भारताला प्रोत्साहन मिळालं आहे, असं जयशंकर यावेळी म्हणाले. 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.