दहशतवादाचा सामना करण्यासाठी भारत आणि अफगाणिस्तानाने एकत्र येऊन काम करण्याची गरज असल्याचा पुनरुच्चार परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी केला आहे. नवी दिल्ली इथे अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्ताकी यांच्याबरोबर झालेल्या भेटीनंतरच्या भाषणात ते बोलत होते. दोन्ही देशांची विकास आणि समृद्धबाबतची वचनबद्धता समान आहे. सरकार अफगाणिस्तानाच्या सार्वभौमत्व, प्रादेशिक अखंडता आणि स्वातंत्र्यासाठी वचनबद्ध असल्याचं जयंशकर यावेळी म्हणाले.
काबुलमधल्या भारताच्या तांत्रिक मिशनला भारतीय दुतावासाचा दर्जा देण्याची घोषणाही यावेळी परराष्ट्र मंत्र्यांनी केली.