डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

राज्यात तिरंगा यात्रेचं आयोजन

७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर आज राज्यभरात तिरंगा यात्रा निघत आहेत. तिरंगा यात्रेसोबतच विविध कार्यक्रम आणि उपक्रम राज्यभरात आज आयोजित करण्यात आले. यवतमाळमध्ये आदिवासी विकास मंत्री अशोक उइके यांच्या मुख्य उपस्थितीत तिरंगा यात्रा काढण्यात आली. ठाणे जिल्हा परिषदेतर्फे आज तिरंगा सन्मान शपथ कार्यक्रम पार पडला. कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. बीड शहरात आज तिरंगा रॅली काढण्यात आली.

 

धुळे शहरातून १ हजार १११ फूट लांब तिरंगा ध्वजासह पदयात्रा काढण्यात आली. पालघर जिल्ह्यात बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं. धाराशिव शहरात सायकल रॅली काढण्यात आली. परभणीजवळच्या ओंकारेश्वर विद्यालयाच्या वतीनं आज तिरंगा रॅली आयोजित करण्यात आली. सांगली, मिरज आणि कुपवाड इथं झालेल्या तिरंगा सायकल रॅलीत १६ शाळांनी भाग घेतला.

 

हिंगोली जिल्हा भाजपाच्या वतीनं जिल्ह्यात तिरंगा रॅली काढण्यात आली. बुलडाणा जिल्ह्यातल्या आदिवासी पाड्यांसह इतर सर्व ठिकाणी आज हर घर तिरंगा अभियानांतर्गत विविध कार्यक्रम घेण्यात आले. मालवणमध्ये आज दुचाकीवरून तिरंगा रॅली काढण्यात आली, तर सावंतवाडीत तिरंगा दौड स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. गडचिरोलीत मॅरेथॉन आणि जनजागृती रॅली घेण्यात आली.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा