डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

सैन्य दलांतल्या ४०० हून अधिक जणांचा राष्ट्रपतींकडून गौरव

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी तिन्ही सैन्य दलं आणि केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या जवानांना १२७ शौर्य पुरस्कार जाहीर केले आणि २९० जणांना विशेष गौरव केला. यात ४ किर्ती चक्रं, १५ वीर चक्रं, १६ शौर्य चक्रं, ६० सेना पदकं, ६ नौसेना पदकं, २६ वायू सेना पदकं, ७ सर्वोत्तम युद्ध सेवा पदकं, ९ उत्तम युद्ध सेवा पदकं आणि २४ युद्ध सेवा पदकांचा समावेश आहे. 

 

लष्करातले कॅप्टन लालरिनावमा सायलो, लेफ्टनंट शशांक तिवारी, लान्स नायक मीनातची सुंदरम आणि शिपाई जंजल प्रवीण प्रभाकर यांना किर्ती चक्रानं सन्मानित केलं जाईल. 

 

विंग कमांडर अभिमन्यू सिंग, पोलीस निरीक्षक रामेश्वर देशमुख यांच्यासह एकूण १६ जणांना शौर्य चक्रानं गौरवलं जाणार आहे. ब्रिगेडीयर मुदीत महाजन, रियर अॅ़डमिरल राहुल गोखले, विंग कमांडर दैवेंद्र औताडे, विंग कमांडर कुणाल शिंपी, विंग कमांडर चिंतामणी तेलंग, स्वाड्रन लीडर कौस्तुभ नलावडे, स्वाड्रन लीडर कौस्तुभ मुळे, मेजर अनुज महाजन, हवालदार विकास मेदाडे, हवालदार कैलास साखरे, लेफ्टनंट कर्नल भुपाल वाघ, नाईक तुलसीसिंग बागले यांनाही विविध सन्मान जाहीर झाले. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा