गडचिरोली पोलीस दलातले ७ अधिकारी आणि अंमलदारांना राष्ट्रपती शौर्यपदक जाहीर

गडचिरोली पोलीस दलातले सात अधिकारी आणि अंमलदारांना राष्ट्रपती शौर्यपदक जाहीर झालं आहे. गडचिरोली पोलीस दलातले सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी बंडगर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मनोहर महाका, लचमा पेंदाम, प्रकाश कन्नाके, अतुल येगोलपवार आणि हिदायत खान यांना शौर्य पुरस्कार देण्यात येणार आहेत. शहीद पोलीस शिपाई सुरेश तेलामी यांना मरणोत्तर हा पुरस्कार दिला जाईल. २०१७ मध्ये भामरागड तालुक्यात नक्षल्यांनी भूसुरुंग स्फोट घडवून पोलिसांवर हल्ला केला होता. यावेळी पोलिसांनी त्यांचा धैर्याने प्रतिकार केला. याशिवाय पोलीस महानिरीक्षक अनिल कुंभारे, पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्यासह एकूण ३ जणांना राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक जाहीर झालं आहे. तर ३९ पोलिस, ५ गृहरक्षक आणि ८ कारागृह सेवेतल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना अत्यकृष्ट सेवा पदक जाहीर झालं आहे. 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.