August 14, 2024 10:37 AM | Sunil Tatkare

printer

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येक जिल्हा कार्यालयात ‘संविधान वाचन’ उपक्रम साजरा करणार – सुनिल तटकरे

राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीनं स्वातंत्र्य दिनी ‘संविधान वाचन’ उपक्रम पक्षाच्या प्रत्येक जिल्हा कार्यालयात ध्वजारोहणानंतर साजरा करणार असल्याची माहिती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी पत्रकार परिषदेत काल दिली. पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात तर अन्य जिल्ह्यांमध्ये पक्षाचे वरीष्ठ नेते, मंत्री, आमदार, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष संविधानाच्या प्रस्तावनेचं वाचन करतील असंही त्यांनी सांगितलं.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.