स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर १ हजार ९० पोलीस, अग्निशमन कर्मचारी, होमगार्ड, नागरी संरक्षण आणि सुधारात्मक सेवेतल्या कर्मचाऱ्यांना सेवा आणि शौर्य पदकं जाहीर झाली आहेत. यामध्ये महाराष्ट्रातल्या पोलीस सेवेतल्या ४९, अग्निशमन सेवेतल्या ८, होमगार्ड ५, तर सुधारात्मक सेवेतल्या ८ कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. पोलीस सेवेतल्या अनिल कुंभारे, प्रमोदकुमार शेवाळे, बाळासाहेब भालचीम, संजय चांदखेडे, नेताजी बंडगर, मनोहर महाका यांना शौर्य पुरस्कार देण्यात येणार आहे. सुरेश तेलामी यांना मरणोत्तर शौर्य पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं सीमा सुरक्षा दलही १६ जवानांना अत्युत्तम वीरतेसाठी शौर्य पदकं प्रदान करणार आहे.