July 15, 2024 7:58 PM

printer

महसूल कर्मचारी संघटनेच्या प्रलंबित मागण्यांसाठी राज्याच्या विविध जिल्ह्यात कर्मचाऱ्यांनी बेमुदत काम बंद आंदोलन

महसूल कर्मचारी संघटनेच्या प्रलंबित मागण्यांसाठी आज राज्याच्या विविध जिल्ह्यात कर्मचाऱ्यांनी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केलं आहे. चंद्रपूर, बीड, हिंगोली या जिल्ह्यांच्या महसूल कार्यालयात आज आंदोलनामुळे कामकाज ठप्प झालं. चंद्रपूर इथं आंदोलनादरम्यान जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तर बीडमध्ये कर्मचाऱ्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी इमारती बाहेर निदर्शनं केली. आंदोलनामुळे कामासाठी आलेल्या ग्रामस्थांना परत जावं लागलं.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.