भारत आणि अमेरिकेच्या लष्करी सहकार्य गटाची २२वी बैठक अमेरिकेत हवाई इथं झाली. भारताचे चीफ ऑफ इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफ एअर मार्शल आशुतोष दीक्षित आणि अमेरिका – भारत प्रशांत क्षेत्र कमांडचे लेफ्टनंट जनरल जोशुआ रड यांच्या संयुक्त अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. या बैठकीत दोन्ही देशांच्या लष्करी अधिकाऱ्यांनी संरक्षण क्षेत्रातला द्विपक्षीय सहभाग अधिक दृढ करणे, परस्पर समन्वयिक कार्यक्षमतेत वृद्धी घडवून आणणे तसेच मुक्त, खुल्या आणि सुरक्षित भारत प्रशांत क्षेत्राशी संबंधित मुद्यांवर चर्चा केली.
Site Admin | November 4, 2025 8:20 PM | India | US
भारत आणि अमेरिकेच्या लष्करी सहकार्य गटाची २२वी बैठक