नवरात्रोत्सवानिमित्त मुंबईतल्या मेट्रोच्या फेऱ्यांमध्ये वाढ

येत्या नवरात्रोत्सवानिमित्त ७ ऑक्टोबर ते ११ ऑक्टोबर दरम्यान मुंबईतल्या मेट्रोच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात येईल. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने हा निर्णय घेतला असून या कालावधीत रात्री उशिरा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अतिरिक्त मेट्रो चालवल्या जातील, अशी माहिती मेट्रोच्या अधिकृत सूत्रांनी दिली आहे.